Posts

 इन्व्हेस्टमेंट ------------------ आपण जगतो आहोत त्या काळाचा अत्यंत आवडीचा विषय “गुंतवणूक”. तशी ती पिढ्यांनपिढ्या चालत आलेली परंपरा आह... https://ayan3101.blogspot.com/ 2023/03/blog-post.html

Science fiction to reality

Image
बहुधा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीचं कुठलं तरी वर्ष असेल. 'छात्र प्रबोधन' मासिकाच्या एका वर्षीच्या दिवाळी अंकात (बहुधा) जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा प्रसिद्ध झाली होती. किती वर्ष पुढच्या काळातली होती ते आठवत नाही पण भविष्यात घडणारी कथा होती ती. त्यात सुरुवातीला एक आजोबा आणि दोन नातू अशी पात्रं होती. आजोबा त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगत असतात. 'मुंबई-पुणे प्रवासाला साडेतीन-चार तास लागायचे'. आज एक-दीड तास लागणाऱ्या प्रवासाला तेव्हा साडेतीन-चार तास का लागायचे याचं नवल त्या भविष्यातल्या नातवंडांना वाटतं. मध्यंतरी मुंबई-पुण्यादरम्यानच्या सुपरफास्ट 'व्हर्जिन हायपरलूप'ची घोषणा झाली तेव्हा, तसंच मे-जूनमध्ये मुंबई-पुणे इंटरसिटीच्या प्रवासाचा अर्धा तास कमी झाल्याची घोषणा झाली तेव्हा जयंत नारळीकरांच्या या विज्ञानकथेची प्रकर्षाने आठवण झाली होती. नारळीकरांच्या कथेतला तो दिवस फार दूर वाटत नाही. आता पुन्हा याची आठवण व्हायचं आणखी एक कारण म्हणजे रिलायन्स जिओफायबरची घोषणा ! त्यातली घरबसल्या फर्स्ट-डे फर्स्ट-शो सुविधा जाहीर झाली आणि पुन्हा नारळीकरांची तीच विज्ञानकथा आठवली. त्

अमित-आभ

Image
अमिताभ... हा ७६ वर्षांचा असला तरी त्याला 'अहो-जाहो' करवत नाही. माझ्यापेक्षा ४८ वर्षांनी मोठा असला तरी 'तो अमिताभ'च आहे. तर... अमिताभचा कुठल्याशा शूटिंगच्या वेळचा एक व्हिडिओ पाहिला. ७६व्या वर्षी तो ज्या उत्साहाने, चपळाईने काम करतोय, विशीत किंवा तिशीत असल्यासारखी इकडून तिकडे धावाधाव करतोय ते पाहताना मनोमन या माणसाला सलाम केला. आयुष्यात त्याने नाव कमावलंच पण साठीच्या उंबरठ्यावर असताना राखेतून फिनिक्सभरारी घेत ज्या यशस्वीपणाने सेकंड इनिंग खेळायला सुरुवात केली (आणि अजूनही खेळतोय) ते पाहताना अमिताभपुढे नतमस्तकच व्हावंसं वाटतं. त्या व्हिडिओत मेकअपवाल्याने कसलासा फवारा मारल्यामुळे (बहुधा) त्याला अचानक दम लागला. पण त्याने पंप घेतला आणि चालू शूटिंग थांबवलं नाही. आम्ही विशी आणि तिशीतल्या अनेकांना जरा काम केलं की कंटाळा येतो, थकायला, बोअर वगैरे होतं. हा माणूस शहात्तराव्या अशी धावाधाव करतो ! आम्हाला ९-६ वेळ ऑफिसात गेला की अख्खा दिवस संपल्यासारखं वाटतं आणि हा माणूस रात्री २-२ ३-३ वाजता शूटिंगहून परत आल्यावर पोस्ट टाकतो. आणि परत सकाळी कामाला पुन्हा हजर असतो. अरे माणसा, किस मिट्टी के

रविवार संध्याकाळ

रविवारची एक निवांत संध्याकाळ. यावेळी मी एकतर मित्रांबरोबर भटकत असतो नाहीतर घरात काहीतरी टाईमपास करत बसून असतो. आज मात्र खालीच एक चक्कर मारायचा मूड येतो. आणि मी लगेच बाहेर पडतो. अशाप्रकारे संध्याकाळची चक्कर मारायला मी फारसा जात नाही. आजीकडे सुट्टीत विरारच्या JP Nagar मध्ये जायचो तेव्हा जायचो असा, त्यानंतर फारसा नाही. सोसायटीच्या Gate 1 पासून Gate 2 पर्यंत बाहेरून चक्कर मारायचं ठरवतो. बेंगळुरूतलं गाव वाटावं असं कोडिचिक्कनहळ्ळी संध्याकाळचं दिसत असतं. मुलाला फिरायला घेऊन निघालेली आई, कुत्र्याला घेऊन निघालेलं जोडपं, नाक्यावरचया वाण्याकडे, भाजीवाल्याकडे खरेदी करणाऱ्या गृहिणी दिसतात आणि आपल्याला JP Nagar मधलं त्यावेळचं एकुलतं एक शॉपिंग सेंटर डोळ्यांसमोर येतं. मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये बास्केट घेऊन खरेदीला जायच्या दिवसांआधी पहिल्यांदा ही पद्धत तिकडे पाहिलेली… मी पुढे चालत राहतो  चाटवाल्याभोवती कोंडाळं करून पाणीपुरी खाणारे शौकीन दिसतात आणि आपण विरारहून थेट माटुंग्याच्या घरी येतो. घराजवळच्या भेळपुरीवाल्याकडे उभे राहून भेळपुरी, शेवपुरी, रगडापुरी किंवा पाणीपुरी खाणारे आपणच दिसतो…. नाक्याजवळून आपण

'Suits' that suits well...

Image
'Suits'चे ६ Seasons बघून झाले. Thanks to Amazon Prime (७वा Prime वर नाहीये). अनेक दर्जेदार इंग्रजी मालिकांमध्ये नक्कीच या मालिकेची गणना करता येईल. Gabriel Macht, Patrick J. Adams या दोन मुख्य कलाकारांनी सहाही Seasons उत्कृष्ट काम केलं आहे. Harvey Specter आणि Mike Ross खरंच कोणी असतील तर अगदी असेच असतील इतकं त्यांना जिवंत उभं केलं आहे. न्यूयॉर्कमधला एक सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील असलेला Harvey, त्याची बेडर वृत्ती, प्रतिस्पर्ध्याला अजिबात दया न दाखवता चारीमुंड्या चीत करणारा त्याचा कणखरपणा, आणि हळूहळू पुढे येत गेलेली त्याची हळवी, भावनिक बाजू.... Gabriel Macht हार्वेच्या पात्राला पुरेपूर न्याय देतो. तीच गोष्ट Mike Ross ची. दुसऱ्यांसाठी पैसे घेऊन परीक्षा देणारा, एकपाठी, तल्लख स्मृती असणारा Bike Messenger ते सहाव्या सीजनच्या अखेरीस New York Bar मध्ये स्वीकारला गेलेला Mike Ross… या पात्राला खूप कंगोरे आहेत. तो हुशार आहे, तल्लख आहे आणि तो संवेदनशीलही आहे. ही संवेदनशील आणि तत्वनिष्ठ वृत्ती त्याला अनेकदा अडचणीत आणते खरी पण त्यातून स्वतःच्या क्षमतेवर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यातून पार

The urge never dies....

Image
"Mom, can't you just stay a couple of hours without calling me every now and then ?”, shouted Rajasi over the phone as she was getting down from the luxury Volvo bus at Sion flyover in Mumbai. “I am not in Delhi, it's just Mumbai, Mom ! Hardly 3 n half hours journey it is !” She was still in the angry mood as she started walking towards Sion circle after hanging up the call, ignoring the cab drivers urging to hire their cab as soon as she had got down. She was well-aware of such drivers charging even 200-250 Rs. for even the nearby areas. “Taxi.....” she waived at a Kali-Peeli Santro as she reached the Sion Circle, the  ‘Rani Laxmibai Chowk’. “Bhaiyya Charni Road.” Throwing her small 2-day travel bag on the backseat and carefully resting her backpack on the lap containing the laptop, she finally settled down in the cab. Rajasi was a 26 year old girl from the town of Karad, a town about 150 km distance from Pune, in the Satara district of Maharashtra situated on the c

'Code मंत्र' - Review

Image
तशी तिची अभिनयाची क्षमता ‘मुंबई-पुणे-मुंबई’ मधून कळली होतीच (‘जोगवा’ मी नंतर बघितला), पण तुम्ही एक सच्चे कलाकार असाल तर तुमच्या क्षमतांना challenge करून तुमच्याकडून सर्वोत्कृष्ट काम करून घेणारं एखादं प्रोजेक्ट कधी ना कधी तुमच्या हाती लागतंच. ‘Code Mantra’ नाटक मुक्तासाठी हे असंच प्रोजेक्ट आहे. स्वतः सहनिर्माती असल्यामुळे मुक्ताच्या वेचक नजरेने ‘Code Mantra’ हे वेगळ्याच विषयावरचं नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी निवडलं आणि Dedicated टीमने हे नाटक अक्षरशः जिवंत उभं केलंय. स्नेहा देसाई लिखित मूळ गुजराती रंगभूमीवर चालू असलेलं हे नाटक मराठी रंगभूमीवर आणलं आहे आणि ते कुठेही कमी पडत नाही. सशक्त कथा आणि पटकथा हा या नाटकाचा पाया आहे. नाटक पाहत असताना पहिला अंक संपतो तेव्हा वाटतं, “अरे, पहिला अंक संपलापण ?” पण एकीकडे असं वाटत असताना दुसरीकडे असं कुठेही वाटत नाही की कुठल्याही बाबतीत काहीतरी कमी पडलंय. नाटकाचा वेगच तसा आहे. कारण अर्थातच नाटकाचा विषय ‘सैन्या’शी संबंधित आहे, त्याला वेग हा हवाच. दुसरा अंक पहिल्या अंकातला वेग सांभाळत पुढे सरकतो आणि तितकाच रंगत, प्रेक्षकांना खिळवून ठेवत शेवट होतो. ‘कर्