Posts

Showing posts from June, 2015

एका 90s kidच्या सुट्टीतला एक दिवस....

Image
काल अनेक दिवसांनी माझी बोटं शिवशिवली, कीबोर्डला व्यायाम मिळाला. मी आज लिहितोय सुट्टीतला आजी-आजोबांकडचा  एक random दिनक्रम. वाचून तुम्हालाही कुठेतरी तुमच्या लहानपणची आठवण होईल, आजी आजोबा आठवतील.... -------------------------------------------------------------------------------------------------------------- आजी, अप्पा आणि मी... माझ्या दुसऱ्या वाढदिवशी मला भाषेची (विशेषतः मराठी) आवड निर्माण होण्यात आजी-आजोबांचा मोठा वाटा होता. लहानपणापासून सतत श्लोक, तसंच रामरक्षा, नवग्रह स्तोत्र, नवनाग स्तोत्र अशी छोटीमोठी स्तोत्र कानावर पडत असत. माझे आजी-आजोबा (वडिलांकडून) हे दोघेही भाषा शिक्षक. आजोबा (त्यांना आम्ही ‘अप्पा’ म्हणायचो) शाळेत मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी शिकवायचे. आजी हे तसेच इतरही विषय शिकवायची. अप्पा म्हणजे कै. श्री. शंकर नारायण दीक्षित, मूळ परशुराम (चिपळूण)चे. मुंबईच्या सुविद्यालय, बोरिवली शाळेचे पहिले मुख्याध्यापक. त्यांना १९८७चा आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कारचे मानकरी. तर आजी शैलजा शंकर दीक्षित, निवृत्त मुख्याध्यापिका, सरस्वती मंदिर, माहीम, मुंबई. तर असा असायचा माझा ...