Posts

Showing posts from June, 2016

'Code मंत्र' - Review

Image
तशी तिची अभिनयाची क्षमता ‘मुंबई-पुणे-मुंबई’ मधून कळली होतीच (‘जोगवा’ मी नंतर बघितला), पण तुम्ही एक सच्चे कलाकार असाल तर तुमच्या क्षमतांना challenge करून तुमच्याकडून सर्वोत्कृष्ट काम करून घेणारं एखादं प्रोजेक्ट कधी ना कधी तुमच्या हाती लागतंच. ‘Code Mantra’ नाटक मुक्तासाठी हे असंच प्रोजेक्ट आहे. स्वतः सहनिर्माती असल्यामुळे मुक्ताच्या वेचक नजरेने ‘Code Mantra’ हे वेगळ्याच विषयावरचं नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी निवडलं आणि Dedicated टीमने हे नाटक अक्षरशः जिवंत उभं केलंय. स्नेहा देसाई लिखित मूळ गुजराती रंगभूमीवर चालू असलेलं हे नाटक मराठी रंगभूमीवर आणलं आहे आणि ते कुठेही कमी पडत नाही. सशक्त कथा आणि पटकथा हा या नाटकाचा पाया आहे. नाटक पाहत असताना पहिला अंक संपतो तेव्हा वाटतं, “अरे, पहिला अंक संपलापण ?” पण एकीकडे असं वाटत असताना दुसरीकडे असं कुठेही वाटत नाही की कुठल्याही बाबतीत काहीतरी कमी पडलंय. नाटकाचा वेगच तसा आहे. कारण अर्थातच नाटकाचा विषय ‘सैन्या’शी संबंधित आहे, त्याला वेग हा हवाच. दुसरा अंक पहिल्या अंकातला वेग सांभाळत पुढे सरकतो आणि तितकाच रंगत, प्रेक्षकांना खिळवून ठेवत शेवट होतो. ‘कर्...