'Code मंत्र' - Review

तशी तिची अभिनयाची क्षमता ‘मुंबई-पुणे-मुंबई’ मधून कळली होतीच (‘जोगवा’ मी नंतर बघितला), पण तुम्ही एक सच्चे कलाकार असाल तर तुमच्या क्षमतांना challenge करून तुमच्याकडून सर्वोत्कृष्ट काम करून घेणारं एखादं प्रोजेक्ट कधी ना कधी तुमच्या हाती लागतंच. ‘Code Mantra’ नाटक मुक्तासाठी हे असंच प्रोजेक्ट आहे. स्वतः सहनिर्माती असल्यामुळे मुक्ताच्या वेचक नजरेने ‘Code Mantra’ हे वेगळ्याच विषयावरचं नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी निवडलं आणि Dedicated टीमने हे नाटक अक्षरशः जिवंत उभं केलंय. स्नेहा देसाई लिखित मूळ गुजराती रंगभूमीवर चालू असलेलं हे नाटक मराठी रंगभूमीवर आणलं आहे आणि ते कुठेही कमी पडत नाही. सशक्त कथा आणि पटकथा हा या नाटकाचा पाया आहे. नाटक पाहत असताना पहिला अंक संपतो तेव्हा वाटतं, “अरे, पहिला अंक संपलापण ?” पण एकीकडे असं वाटत असताना दुसरीकडे असं कुठेही वाटत नाही की कुठल्याही बाबतीत काहीतरी कमी पडलंय. नाटकाचा वेगच तसा आहे. कारण अर्थातच नाटकाचा विषय ‘सैन्या’शी संबंधित आहे, त्याला वेग हा हवाच. दुसरा अंक पहिल्या अंकातला वेग सांभाळत पुढे सरकतो आणि तितकाच रंगत, प्रेक्षकांना खिळवून ठेवत शेवट होतो. ‘कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक यामधली पातळ सीमारेषा’ या टॅगलाईनशी पूर्णपणे इमान राखत बांधीव पटकथेतून नाटक शेवटपर्यंत प्रवास करतं हा या नाटकाचं फार मोठं यश आहे.
यात अजून एक करायचा उल्लेख म्हणजे पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना आणि नेपथ्य ! सैनिकी पार्श्वभूमीचा बाज सांभाळणारी साजेशी प्रकाशयोजना आणि संगीत हे नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. विशेष उल्लेख नेपथ्याचा ! आर्मीशी संबंधित वेगवेगळी नेपथ्य उभी करणं ही कठीण गोष्ट अजिबात किचकट नेपथ्य न वाटता आपल्यासमोर सादर होते. याशिवाय backstage crew चा उल्लेख विशेष करावा लागेल कारण नाटकाला मध्यंतर वगळता एकही blackout नसल्यामुळे backstage चं काम सोपं नाही. संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत पदोपदी दिसून येते.
आता उल्लेख अशा घटकांचा ज्यांच्या मजबूत खांद्यांवर हे नाटक उभं आहे ते म्हणजे या नाटकातले कलाकार. ११ कलाकार आणि कॅडेट्ससह एकूण ४० कलाकारांनी अक्षरशः ‘सैन्याच्या शिस्तीने’ नाटक पेललं आहे. प्रत्येक कलाकार खरा वाटणं हे कुठल्याही कलाकृतीचं आणि कलाकाराचं यश असतं आणि सगळेच्या सगळे ४० कलाकार आणि अर्थातच ही कलाकृती हे यश संपादन करते.
मघाशी म्हटल्याप्रमाणे ‘Role of life’ म्हणावा अशी भूमिका वाट्याला आलेले दोन प्रमुख कलाकार म्हणजे अजय पूरकर आणि मुक्ता बर्वे !!! मध्यंतराच्या आधी दोघांची रंगलेली अफलातून जुगलबंदी ही नाटकाच्या दुसऱ्या अंकात कळसाला पोचते. आपल्याला सचिन तेंडुलकर वि. अक्रम/ली/अख्तर/डोनाल्ड किंवा फेडरर वि. नदाल/जोकोविच हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी आमनेसामने आल्यावर जो आनंद मिळतो तोच आनंद इथे अजय पूरकर आणि मुक्ता बर्वे या दोघांतला अभिनयाचा सामना बघताना मिळतो. दोघं एकमेकांना पावलोपावली challenge करत राहतात and in-turn the audience is treated to see the best of the two.  मुक्ताच्या आतापर्यंतच्या career मधली milestone ठरावी अशी ही भूमिका आहे. मी Suspense फोडणार नाही पण एवढं मात्र सांगेन कि अहिल्या देशमुख (मुक्ता) आणि प्रतापराव निंबाळकर (अजय पूरकर) या दोन व्यक्तींमधला नव्हे तर विचारांमधला हा संघर्ष एका अनपेक्षित वळणावर येऊन संपतो आणि शेवटी उरतो तो भारला गेलेला प्रत्येक प्रेक्षक, गडकरी रंगायतनमधला टाळ्यांचा कडकडाट आणि standing ovation !!! मुक्ताच्या मी आत्तापर्यंत बघितलेल्या भूमिकांपैकी निःशंकपणे ही सर्वोत्कृष्ट भूमिका !!! हे कौतुक मुक्ता माझी आवडती अभिनेत्री आहे म्हणून नाही तर एका कलाकाराच्या अभिनय क्षमतेला केलेला सलाम आहे.
आपण मराठी प्रेक्षक आतापर्यंत बहुतेक कौटुंबिक नाटकांना पसंती देत आलो आहोत. पण मराठी नाटकाचा प्रेक्षक असल्याचा अभिमान वाटावा असा चाकोरीच्या बाहेरचा हा अफलातून रंगलेला प्रयोग नाट्यप्रेमींनी जरूर नाट्यगृहात जाऊन बघावा. कथा-पटकथा-दिग्दर्शन-संगीत-नेपथ्य-प्रकाश-अभिनय सर्वच अंगांनी ‘देखणा’ असा हा प्रयोग चुकवलात तर नक्कीच काहीतरी मोठं miss कराल !!!

-कौस्तुभ दीक्षित

२६-६-२०१६

Comments

Popular posts from this blog

'आमचे ग्रहण अजून(ही) सुटलेले नाही'

'Suits' that suits well...