Access Card... ऑफिसचं आणि जगण्याचं !
शुक्रवारी ऑफिसात earphones विसरलो. शनिवारी काही कामानिमित्त ऑफिसच्या इथूनच जाणं होणार होतं. तेव्हाच जाऊन deskवरचे earphones घेऊ असं ठरवलं. पण शनिवारी बाहेर पडलो तेव्हा I-card/Access Card घ्यायचं विसरून गेलो. मग temporary ID आणि Access घेऊन जाऊ असा विचार केला. त्याप्रमाणे ID मिळालं पण Access Cardचा server down होता त्यामुळे ते मिळू शकलं नाही. कोणीतरी असेल आतमध्ये त्याच्याकडून Access घेऊ असा विचार केला आणि वर गेलो. पण सुट्टीमुळे कोणीच नव्हतं. शेवटी एकजण आला आणि त्याने access दिला खरा पण बराच वेळ ऑफिसच्या दरवाजाबाहेर थांबावं लागलं. त्याआधी कितीतरी वेळ काचेतून आत बघत होतो. इथे एरवी रोज माझा मुक्त संचार असतो. मनात आलं की आतबाहेर करू शकतो मी. पण त्यादिवशी मला आत प्रवेश नव्हता कारण माझ्याकडे Access नव्हता. मनाच्या Access Cardsचंसुद्धा असंच ! एरवी त्याच्याकडे universal access card असतं. पण कधीकधी कुठेतरी माशी शिंकते आणि अचानक कुठल्यातरी खोलीत प्रवेश निषिद्ध होतो. Access blocked !!! खरंतर माशी नाही माणसं शिंकलेली असतात. भांडण म्हणा किंवा परिस्थिती उद्भवते म्हणा काहीतरी होतं आणि आपलं a...