Posts

Showing posts from 2018

अमित-आभ

Image
अमिताभ... हा ७६ वर्षांचा असला तरी त्याला 'अहो-जाहो' करवत नाही. माझ्यापेक्षा ४८ वर्षांनी मोठा असला तरी 'तो अमिताभ'च आहे. तर... अमिताभचा कुठल्याशा शूटिंगच्या वेळचा एक व्हिडिओ पाहिला. ७६व्या वर्षी तो ज्या उत्साहाने, चपळाईने काम करतोय, विशीत किंवा तिशीत असल्यासारखी इकडून तिकडे धावाधाव करतोय ते पाहताना मनोमन या माणसाला सलाम केला. आयुष्यात त्याने नाव कमावलंच पण साठीच्या उंबरठ्यावर असताना राखेतून फिनिक्सभरारी घेत ज्या यशस्वीपणाने सेकंड इनिंग खेळायला सुरुवात केली (आणि अजूनही खेळतोय) ते पाहताना अमिताभपुढे नतमस्तकच व्हावंसं वाटतं. त्या व्हिडिओत मेकअपवाल्याने कसलासा फवारा मारल्यामुळे (बहुधा) त्याला अचानक दम लागला. पण त्याने पंप घेतला आणि चालू शूटिंग थांबवलं नाही. आम्ही विशी आणि तिशीतल्या अनेकांना जरा काम केलं की कंटाळा येतो, थकायला, बोअर वगैरे होतं. हा माणूस शहात्तराव्या अशी धावाधाव करतो ! आम्हाला ९-६ वेळ ऑफिसात गेला की अख्खा दिवस संपल्यासारखं वाटतं आणि हा माणूस रात्री २-२ ३-३ वाजता शूटिंगहून परत आल्यावर पोस्ट टाकतो. आणि परत सकाळी कामाला पुन्हा हजर असतो. अरे माणसा, किस मिट्टी के ...

रविवार संध्याकाळ

रविवारची एक निवांत संध्याकाळ. यावेळी मी एकतर मित्रांबरोबर भटकत असतो नाहीतर घरात काहीतरी टाईमपास करत बसून असतो. आज मात्र खालीच एक चक्कर मारायचा मूड येतो. आणि मी लगेच बाहेर पडतो. अशाप्रकारे संध्याकाळची चक्कर मारायला मी फारसा जात नाही. आजीकडे सुट्टीत विरारच्या JP Nagar मध्ये जायचो तेव्हा जायचो असा, त्यानंतर फारसा नाही. सोसायटीच्या Gate 1 पासून Gate 2 पर्यंत बाहेरून चक्कर मारायचं ठरवतो. बेंगळुरूतलं गाव वाटावं असं कोडिचिक्कनहळ्ळी संध्याकाळचं दिसत असतं. मुलाला फिरायला घेऊन निघालेली आई, कुत्र्याला घेऊन निघालेलं जोडपं, नाक्यावरचया वाण्याकडे, भाजीवाल्याकडे खरेदी करणाऱ्या गृहिणी दिसतात आणि आपल्याला JP Nagar मधलं त्यावेळचं एकुलतं एक शॉपिंग सेंटर डोळ्यांसमोर येतं. मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये बास्केट घेऊन खरेदीला जायच्या दिवसांआधी पहिल्यांदा ही पद्धत तिकडे पाहिलेली… मी पुढे चालत राहतो  चाटवाल्याभोवती कोंडाळं करून पाणीपुरी खाणारे शौकीन दिसतात आणि आपण विरारहून थेट माटुंग्याच्या घरी येतो. घराजवळच्या भेळपुरीवाल्याकडे उभे राहून भेळपुरी, शेवपुरी, रगडापुरी किंवा पाणीपुरी खाणारे आपणच दिसतो…. नाक्याजवळून...

'Suits' that suits well...

Image
'Suits'चे ६ Seasons बघून झाले. Thanks to Amazon Prime (७वा Prime वर नाहीये). अनेक दर्जेदार इंग्रजी मालिकांमध्ये नक्कीच या मालिकेची गणना करता येईल. Gabriel Macht, Patrick J. Adams या दोन मुख्य कलाकारांनी सहाही Seasons उत्कृष्ट काम केलं आहे. Harvey Specter आणि Mike Ross खरंच कोणी असतील तर अगदी असेच असतील इतकं त्यांना जिवंत उभं केलं आहे. न्यूयॉर्कमधला एक सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील असलेला Harvey, त्याची बेडर वृत्ती, प्रतिस्पर्ध्याला अजिबात दया न दाखवता चारीमुंड्या चीत करणारा त्याचा कणखरपणा, आणि हळूहळू पुढे येत गेलेली त्याची हळवी, भावनिक बाजू.... Gabriel Macht हार्वेच्या पात्राला पुरेपूर न्याय देतो. तीच गोष्ट Mike Ross ची. दुसऱ्यांसाठी पैसे घेऊन परीक्षा देणारा, एकपाठी, तल्लख स्मृती असणारा Bike Messenger ते सहाव्या सीजनच्या अखेरीस New York Bar मध्ये स्वीकारला गेलेला Mike Ross… या पात्राला खूप कंगोरे आहेत. तो हुशार आहे, तल्लख आहे आणि तो संवेदनशीलही आहे. ही संवेदनशील आणि तत्वनिष्ठ वृत्ती त्याला अनेकदा अडचणीत आणते खरी पण त्यातून स्वतःच्या क्षमतेवर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यातून पार...