Posts

'रात्र'

Image
------------------------------------------------------------------------------ 'रात्रीला उत्तर देता देता ये उत्तररात्र प्रश्न जरी ना सुटले, उलगडे तरीही रात्र केसांत माळला गजरा अलगद विलगत जातो, सलगी करू पहाते मोकळी सुगंधी रात्र हे काय क्षणांचे अमृत, ओठांनी प्राशन केले आसुसल्या ओठांशी ओठांवर खेळे रात्र अवखळशा स्पर्शाचे, सर्वांगी नर्तन चाले रंध्रारंध्रातुन तेव्हा रोमांचित होते रात्र श्वासांची लयकारी उष्णाने प्रसरण पावे संथातून अतीद्रुताचा, मग प्रवास करते रात्र वेगावर होऊन स्वार, सामावून घे तूफान, अखेर रिक्त थकिस्त, विरक्त होते रात्र गुंफण केल्या हाती, सरते तरीही उरते, उरता उरता सरते, अन् पहाट होते रात्र' ---------------------------------------------- -कौस्तुभ १२-४-२०१६ ----------------------------------------------

'दिव्यत्वाची जेथ प्रचीती'

Image
५ - ६ महिन्यांपूर्वीची गोष्ट ..... एका आगामी बहुचर्चित सिनेमाची एकएक गाणी यूट्यूबवर यायला लागली होती . प्रोमोज् आणि गाण्यांवरून हा सिनेमा दृक् - श्राव्य मेजवानी असणार याची खात्री वाटत होती . आधारित कलाकृती असल्यामुळे प्रभाव राहू नये म्हणून मुद्दाम मूळ कलाकृती पहायचं टाळत होतो . काही दिवसांनी बहुप्रतीक्षित असा संपूर्ण सलग Jukebox यूट्यूबवर आला . रात्री हेडफोन्स् घालून सगळी गाणी लगेच अधाशासारखी ऐकली आणि ' कान तृप्त होणं ' म्हणजे काय याचा याचि देही याचि कर्णी अनुभव घेतला . हो .... बरोब्बर ओळखलंत .... सिनेमाचं नाव ' कट्यार काळजात घुसली '.... ' तेजोनिधी लोहगोल ', ' घेई छंद मकरंद ' ( दोन्ही चाली ), ' दिन गेले ', ' मुरलीधर श्याम ', ' सुरत पिया की ' अशी मूळ नाटकातली पदं शंकर महादेवन् , राहुल देशपांडे आणि महेश काळे या सर्व ( सूर ) श्रींच्या कसलेल्या आवाजात ऐकताना दारव्हेकर मास्तर , अभिषेकी बुवा , पं . वसंतराव देशपांडे या देवत्रयीला मनोमन ...