No Prejudice please....

'धक्का', 'अप्रूप', 'आश्चर्य', 'अरे बापरे असं कसं झालं ?', 'चूक', 'बरोबर' अशा शब्दांच्या कितीतरी पलीकडे जगते मी आता.. जो जसा आहे तसा स्वीकारण्यात थ्रिल आहे... मला मजा वाटते फार... अगदी आहे तशीच व्यक्ती.... एकही तक्रार डोकं वर काढत नाही. खूप छान वाटतंय या अनुभवासोबत... एन्जॉय करतेय मी. एखादी गोष्ट बोलण्यामागे नक्की काय अनुभव असेल हा विचार करताना काहीतरी सस्पेन्स reveal होत असल्यासारखं वाटतं. त्याने दिलेल्या मतांवरून एकंदरीत मानसिकता कशी असेल याचा अंदाज बांधता येतो... अर्थात ते पूर्णपणे जमतंच अस नाही; अपवाद असतातच. पण व. पु. म्हणतात - 'एखाद्या माणसाला करेक्ट ओळखणे हा जगातला सर्वश्रेष्ठ आनंद असतो.' आणि हा आनंद अनुभवणं म्हणजे धमाल !!
कुणी अमुक गोष्ट केली म्हणून तो वाईट... कुणी तमुक गोष्ट केली तर तो चांगला असं लगेच ठरवून मोकळे होतो आपण... अरे पण का ? ज्या कुणी ती अमुक किंवा तमुक गोष्ट केली ती तशी परिस्थिती उद्भवली म्हणून करावी लागली. कुठल्या हेतूने केली किंवा का केली गेली हे न बघता त्यावर स्वतःच्या चांगल्या आणि वाईटाच्या व्याख्येनुसार लेबल चिकटवणार... आणि झाली ती व्यक्ती तुमच्या नजरेत बदनाम !! फार कीव येते असा विचार करणाऱ्यांची मला. त्यांना ओरडून सांगावसं वाटतं, चूक आणि बरोबर या पलीकडेही जग आहे. जरा या तिकडे... तुम्हीही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू दया. अर्थात असं नुसतं सांगून काही होणार नाही. हे ज्याचं त्यालाच कळायला हवं... कारण सांगितलेला मुद्दा 'कळायला' परिपक्वता लागते, 'ऐकायला' नाही. काय हरकत आहे आपली मनाची पाटी कोरी ठेवून जगायला ? शिकण्यासारखं खूप काही मिळेल. मनात पूर्वग्रहांचं ओझं घेऊन खूप जगलात आता जरा हलके होऊन जगा.
-अवंती
This comment has been removed by the author.
ReplyDeleteVery 1st blog n u r der.... awesome !
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteएखादा व्यक्ती चुकीचा वागला तर तो वाईटच असणार हा पूर्वग्रह का करतात लोक, हे मला नेहमी पडणारा प्रश्न..
ReplyDeleteKhuuuuuuuuuuuuup sundar... He jyala kallla tyala sukhi jafnyachi gurukilli milali.. Hats off Avanti..
ReplyDelete