Posts

Showing posts from 2015

Lamhaa

Image
Add caption                           लम्हा 'लम्हा' वो छूना चाहता था तुम्हे और क़रीब आना था उसे तुम्हारे   महसूस कराने साँसोंको.. फासलें नजदीकियोंके मिटाने थे उसे   उम्रभर क़ैद करने उस पल को... वो एक ही बूंद में प्यास बुझानी थी उसे     अरमानों की बारिश में भीगने को...                                                                                                            बिना लफ्जों के बहोत कुछ कहना था उसे                                                       ...

Perfection चा अट्टाहास कशासाठी?

Image
परवा अगदी सहज पाऊस बघत gallery त उभी होते. पाऊस नुसता अंगात आल्या सारखा कोसळत होता, कधी सरळ तर कधी वेडावाकडा. तो मनसोक्त बरसत होता, अगदी त्याला हवा तसा. उन्मुक्त. त्या पावसाला असं पडताना बघून एक क्षण मला त्याचा हेवा वाटला. त्या पावसाच्या कोसळण्यात कुठेही perfection नव्हतं, पण तरीही त्याचं असं वेडंवाकडं कोसळणं बघूनही मला आनंद होत होता. हे सगळं बघत असतानाच मनात विचार आला, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी perfection चा अट्टाहास का? आपल्याला लहानपणापासून सांगितलं rather शिकवलं जातं 'तू आयुष्यात कुठलीही गोष्ट कर, पण ती perfectly कर' तू जे काही करशील ते सर्वोत्तमच असायला हवं, पण ह्या perfection च्या नादात आपण जगण्यातला, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हरवून बसतो. आपल्या ह्या छोटयाशा आयुष्यातील गणितं सोडवताना ती अगदी काटेकोरपणे आणि बिनचूक सोडवण्याचा आपण सगळेच मनापासून प्रयत्न करत असतो, पण खरं सांगायचं तर आपल्या या इतक्या छान आयुष्यात जर सगळंच अगदी perfect साचातलं मिळालं तर त्याचा काय उपयोग? कारण... दुःख सहन करण्याची ताकद, दुःखानंतर आलेल्या सुखामुळे झालेला आ...

एका 90s kidच्या सुट्टीतला एक दिवस....

Image
काल अनेक दिवसांनी माझी बोटं शिवशिवली, कीबोर्डला व्यायाम मिळाला. मी आज लिहितोय सुट्टीतला आजी-आजोबांकडचा  एक random दिनक्रम. वाचून तुम्हालाही कुठेतरी तुमच्या लहानपणची आठवण होईल, आजी आजोबा आठवतील.... -------------------------------------------------------------------------------------------------------------- आजी, अप्पा आणि मी... माझ्या दुसऱ्या वाढदिवशी मला भाषेची (विशेषतः मराठी) आवड निर्माण होण्यात आजी-आजोबांचा मोठा वाटा होता. लहानपणापासून सतत श्लोक, तसंच रामरक्षा, नवग्रह स्तोत्र, नवनाग स्तोत्र अशी छोटीमोठी स्तोत्र कानावर पडत असत. माझे आजी-आजोबा (वडिलांकडून) हे दोघेही भाषा शिक्षक. आजोबा (त्यांना आम्ही ‘अप्पा’ म्हणायचो) शाळेत मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी शिकवायचे. आजी हे तसेच इतरही विषय शिकवायची. अप्पा म्हणजे कै. श्री. शंकर नारायण दीक्षित, मूळ परशुराम (चिपळूण)चे. मुंबईच्या सुविद्यालय, बोरिवली शाळेचे पहिले मुख्याध्यापक. त्यांना १९८७चा आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कारचे मानकरी. तर आजी शैलजा शंकर दीक्षित, निवृत्त मुख्याध्यापिका, सरस्वती मंदिर, माहीम, मुंबई. तर असा असायचा माझा ...

इंटरनेट @१९९९

Image
Net Neutralityचा विषय चव्हाट्यावर आला आणि इंटरनेट रांगत असतानाचे दिवस आठवले. २०व्या शतकाची शेवटची २-३ वर्ष आणि २१व्या शतकाची पहिली २-३ वर्ष म्हणजे साधारण १९९९-२००२ च्या आसपासचा काळ. जमाना Dial-upचाच होता. VSNLचं नेट कनेक्ट करायला घेतलं की 'Status : Dialing' असं मॉनिटरवर दाखवत तो एक्सटर्नल मोडेम नामक रातकिडा "टिक् टिर्रर्रर्रर्रऽऽऽ" करत डायल करायला सुरुवात करायचा. VSNL हे सरकारी काम असल्यामुळे दोन मिनिटं तरी थांबावं लागायचंच ! Connect करायचे अनेक नंबर्स असले तरी सरकारी नियमां(!)प्रमाणे त्यातला एकच नंबर चालायचा. तो नंबर "टीं टीं टीं टीं टीं" केकाटत डायल व्हायचा. त्यानंतर परत त्या मोडेमच्या अंगात रातकिडा आणि जोडीला घुबड शिरून "टींऽऽऽ रूंऽऽऽ खर्रर्रर्रर्र टीं टूं टक् खर्रर्रर्र" असे भयंकर आवाज येऊन मॉनिटरवर 'Verifying username and password' असा मेसेज् दिसायचा. हा मेसेज् दिसला म्हणजे बाबा आणि मी इंडिया जिंकल्याची दुर्मिळ (त्यावेळी तेही दुर्मिळच होतं !) घटना घडल्यासारखे क्षण दोन क्षणांची दिवाळी साजरी करत असू, कारण असा मेसेज् येणं हे खरंच ...

'आमचे ग्रहण अजून(ही) सुटलेले नाही'

Image
शाळेत मराठीच्या पुस्तकात (९वी/१०वी) समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा एक धडा होता याच नावाचा, 'आमचे ग्रहण अजून सुटलेले नाही'. साधारण १२५ वर्षांपूर्वीचं निबंधलेखन असावं. त्यात भारतीय समाजातल्या अंधश्रद्धांवर कडाडून टीका केलेली होती. आगरकरांनी त्यात ग्रहणकाळात 'सचैल स्नान' करायच्या प्रथेबद्दल लिहिलं होतं. ज्योतिषशास्त्राबद्दलही लिहिलं होतं. आज Whatsappवर ग्रहणकाळात काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दल एका messageमध्येही न पुरणारा भलामोठा message सकाळी सकाळी आला. मलमूत्र विसर्जन करू नये, अन्नपाणी ग्रहण करू नये, शिवणकाम करू नये, तेल लावू नये, स्नान करावे, जप करावे, दानधर्म करावा, अमुक केलं तर हा रोग होईल, तमुक केलं तर तो रोग होईल. हे केलं तर या नरकात जाल, ते केलं तर त्या नरकात जाल असं बरंच काही लिहिलं होतं कुठल्या कुठल्या पुराणांचे हवाले देऊन. असा मेसेज बघून बहुतेक Whatsappही वैतागलं असावं. कारण शेवटी 'Message too long, truncated by Whatsapp' असं आलं होतं. Message वाचून अक्षरशः कपाळावर हात मारला. "तो चंद्र बिचारा सतत सूर्याचा दा...

Access Card... ऑफिसचं आणि जगण्याचं !

Image
शुक्रवारी ऑफिसात earphones विसरलो. शनिवारी काही कामानिमित्त ऑफिसच्या इथूनच जाणं होणार होतं. तेव्हाच जाऊन deskवरचे earphones घेऊ असं ठरवलं. पण शनिवारी बाहेर पडलो तेव्हा I-card/Access Card घ्यायचं विसरून गेलो. मग temporary ID आणि Access घेऊन जाऊ असा विचार केला. त्याप्रमाणे  ID मिळालं पण Access Cardचा server down होता त्यामुळे ते मिळू शकलं नाही. कोणीतरी असेल आतमध्ये त्याच्याकडून Access घेऊ असा विचार केला आणि वर गेलो. पण सुट्टीमुळे कोणीच नव्हतं. शेवटी एकजण आला आणि त्याने access दिला खरा पण बराच वेळ ऑफिसच्या दरवाजाबाहेर थांबावं लागलं. त्याआधी कितीतरी वेळ काचेतून आत बघत होतो. इथे एरवी रोज माझा मुक्त संचार असतो. मनात आलं की आतबाहेर करू शकतो मी. पण त्यादिवशी मला आत प्रवेश नव्हता कारण माझ्याकडे Access नव्हता. मनाच्या Access Cardsचंसुद्धा असंच ! एरवी त्याच्याकडे universal access card असतं. पण कधीकधी कुठेतरी माशी शिंकते आणि अचानक कुठल्यातरी खोलीत प्रवेश निषिद्ध होतो. Access blocked !!! खरंतर माशी नाही माणसं शिंकलेली असतात. भांडण म्हणा किंवा परिस्थिती उद्भवते म्हणा काहीतरी होतं आणि आपलं a...

Hindu New Year

Image
Today is the First Day of year according to the Hindu Calendar, i.e. the first day of the first Hindu month ' Chaitra '. It is celebrated with various names across different states/regions in India; Gudhi Padwa in my own Maharashtra, Ugadi  in Karnataka, Andhra and Telangana, Sajibu Nongma Panba/Cheiraoba in Manipur, Navreh  in Kashmir, Thapna  in Rajasthan,  Cheti Chand (next day) in Sindh, Chaitti in Himachal Pradesh. While some celebrate it in the mid-April; ( Rongali Bihu  in Assam,  Puthandu  in Tamilnadu, Vishu  in Kerala,  Mahavishuva Sankranti  in Odisha) the holy day is generally celebrated to mark the arrival of the Spring season (वसंत ऋतू). Also, it is considered to be 1 out of the 3.5 Muhoortas (मुहूर्त). So whichever region you live in, this period is the beginning of the new year in India. Wish you all a very happy and prosperous new year. :) (Source : Wikipedia ) शुभेच्छा आणि श्रद्धांजली हे दोन...

No Prejudice please....

Image
                                    'धक्का', 'अप्रूप', 'आश्चर्य', 'अरे बापरे असं कसं झालं ?', 'चूक', 'बरोबर' अशा शब्दांच्या कितीतरी पलीकडे जगते मी आता.. जो जसा आहे तसा स्वीकारण्यात थ्रिल आहे... मला मजा वाटते फार... अगदी आहे तशीच व्यक्ती.... एकही तक्रार डोकं वर काढत नाही. खूप छान वाटतंय या अनुभवासोबत... एन्जॉय करतेय मी. एखादी गोष्ट बोलण्यामागे नक्की काय अनुभव असेल हा विचार करताना काहीतरी सस्पेन्स reveal होत असल्यासारखं वाटतं. त्याने दिलेल्या मतांवरून एकंदरीत मानसिकता कशी असेल याचा अंदाज बांधता येतो... अर्थात ते पूर्णपणे जमतंच अस नाही; अपवाद असतातच. पण व. पु. म्हणतात - 'एखाद्या माणसाला करेक्ट ओळखणे हा जगातला सर्वश्रेष्ठ आनंद असतो.' आणि हा आनंद अनुभवणं म्हणजे धमाल !! कुणी अमुक गोष्ट केली म्हणून तो वाईट... कुणी तमुक गोष्ट केली तर तो चांगला असं लगेच ठरवून मोकळे होतो आपण... अरे पण का ? ज्या कुणी ती अमुक किंवा तमुक गोष्ट केली ती तशी परिस्थिती उद्भवली म्हणून करावी लागली. कुठल्या हेतूने केली किंवा का के...